1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (16:00 IST)

लग्न समारंभात लग्नाचे फेरे घेताना हार्ट अटॅक येऊन नवरदेवाचा मृत्यू

groom died of a heart attack during the wedding ceremony
लग्न समारंभात वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. राणीखेत येथील शिवमंदिरात लग्नाचे सात फेरे घेतल्यानंतर नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवरदेवाच्या मृत्यूमुळे क्षणात आनंदाचे रूपांतर शोकात झाले. या घटनेनंतर वधू-वरांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, राणीखेत येथील श्रीधरगंज मोहल्ला येथे राहणाऱ्या वधूचा विवाह सोहळा सुरू होता.

हल्दवणीचे समीर उपाध्याय वरात घेऊन शिवमंदिर लग्नस्थळी येथे पोहोचले. यानंतर एकामागून एक लग्नाचे विधी पूर्ण झाले. संपूर्ण कुटुंबिय आनंदात होते. दरम्यान, वधू-वरांच्या सात फेऱ्या झाल्या. सात फेरे घेताना नवरदेव अचानक कोसळून बेशुद्ध झाला. तातडीने त्याला रुग्णालयात नेले तिथे डॉक्टरांनी त्याला मोठ्या रुग्णालयासाठी रेफर केले. नवरदेवाला रुग्णालयात नेत असताना त्याचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.  या  घटनेनंतर  लग्नघराचे  वातावरण  शोकाकुल झाले .कोणालाही  काय  झाले  समजलेच  नाही .या घटनेमुळे दोन्ही कुटुंबात शोककळा पसरली आहे. 
 
Edited By - Priya Dixit