Biodata Maker marathi
✕

दोन डोकी तीन हाताचे बाळ, डॉक्टर म्हणाले - आयुष्य जास्त नाही

Updated: गुरूवार, 31 मार्च 2022 (13:57 IST)
 
दोन चेहऱ्यांमागे तिसरा हात आहे
नवजात बालकाचा तिसरा हात दोन चेहऱ्यांच्या मागील बाजूस आहे. या बालकाला जन्मानंतर काही काळ रतलामच्या एसएनसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. तेथून मुलाला एमवाय हॉस्पिटल इंदूरमध्ये रेफर करण्यात आले.

डॉक्टर म्हणाले - नवजात बाळाचे आयुष्य जास्त नाही
नवजात बालकावर उपचार करणारे डॉ म्हणाले, "हे दाम्पत्याचे पहिले अपत्य आहे. यापूर्वी सोनोग्राफी अहवालात दोन अपत्ये असल्याचे आढळून आले होते. ही दुर्मिळ घटना आहे, त्यांचे आयुष्य फार जास्त नाही. "
 
मुलाला डिसेफॅलिक पॅरापॅगस रोग 
त्यांनी पुढे सांगितले की मुलाच्या शरीराचा काही भाग सामान्य आहे. मुलाला दोन पाठीचे हाडे आणि एक पोट आहे. ही अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती आहे. त्यांनी सांगितले की मुलाला डायसेफॅलिक पॅराफॅगस नावाचा आजार आहे. डॉ म्हणाले की, मुलाचे वजन सुमारे 3 किलो असून बाळाच्या शरीरात हालचाल होत आहे. मात्र मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
 
नवजात मुलाची आई अजूनही रतलामच्या एसएनसीयू रुग्णालयात दाखल आहे. एसएनसीयूचे प्रभारी डॉ. यांनी सांगितले की, बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत बाळं एकतर गर्भातच मरतात किंवा जन्माच्या 48 तासांच्या आत मरतात. अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया हा पर्याय असला तरी, अशा मुलांपैकी 60 ते 70 टक्के मुले जगू शकत नाहीत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments