'रॅन्समवेअर'चा 150 देशातील 2 लाख संगणकांना फटका
आतापर्यंतचा 'रॅन्समवेअर' व्हायरसच्या सायबर हल्ल्याचा 150 देशातील जवळपास 2 लाख संगणकांना फटका बसला आहे. अजूनही हा धोका पूर्णपणे टळलेला नाही. युरोप, अमेरिकेला या सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला असला तरी, आशिया खंडात या सायबर हल्ल्याचा अजूनपर्यंत अंत्यत वाईट परिणाम दिसून आलेला नाही. भारतालाही या सायबर हल्ल्याचा काही प्रमाणात फटका बसला आहे.