.... 30 वर्षांनंतर कोट्याधीश होऊन परतली
एखाद्या निर्णयाचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल काही सांगता येत नाही, अशा निर्णयाचे कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक पडसाद पडू शकतात, परंतु कोलकात्यातील एका मुलीने घेतलेल्या निर्णयाचा आजही तिला अभिमान वाटतो. लग्न करण्यासाठी घरच्यांकडून कमालीचा दबाव आल्याने चंदा झवेरी वयाच्या सतराव्या वर्षी घरातून पळून गेल्या होता, परंतु 30 वर्षांनी जेव्हा माघारी येण्याचा निर्णय घेतला तेव्हा चक्क कोट्याधीश होऊन परतल्या. आपला जीवनप्रवास उलगडून सांगताना 'अॅक्टिव्हेटर कंपनी'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा झवेरी म्हणतात, मी मारवाडी कुटुंबातील आहे. सतराव्या वर्षी लग्न करण्यासाठी माझ्या आईकडून माझ्यावर दबाव टाकण्यात येत होता. मला आताच लग्न करायचे नाही. माझा मार्ग वेगळा आहे. असे अनेक वेळी मी तिला समजावून सांगितले, परंतु ती माझे काहीएक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. जर तू लग्न केले नाही, तर मी आत्महत्या करेल, अशी धमकीही तिने दिली होती. भारतात मैत्री झालेल्या काही अमेरिकी व्यक्तींच्या कुटुंबासह चंदा झवेरी अमेरिकेला निघून गेल्या. यावेळी त्यांच्याजवळ एकही रुपया नव्हता. केवळ तीन साड्या घेऊन त्यांनी घर सोडले होते. अमेरिकेतील त्या कुटुंबाने चंदा यंना आपल्या कुटुंबात सामील करून घेतले. आज चंदा झवेरी मारवाडी समाजासाठी एक प्रेरणास्थान झाल्या आहेत. त्यांच्या नावावर चार पेटंट असून, त्या 'मॉलेक्युलर बायोलॉजिस्त' आहते. अमेरिकेतील प्रमुक 'स्कीन केअर कंपनी'च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्या विराजमान झाल्या आहेत.