शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. धर्म
  2. नवरात्रि 2022
  3. नवरात्रि पूजा
Written By
Last Modified शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (15:37 IST)

Katyayani नवरात्रीची सहावी शक्ती कात्यायनी, पूजा विधी, मंत्र आणि स्त्रोत

Mata Katyayani
कात्यायनी ही दुर्गा देवीची सहावी अवतार आहे. शास्त्रानुसार जे भक्त दुर्गा मातेच्या सहाव्या विभूती कात्यायनीची पूजा करतात, त्यांच्यावर मातेचा आशीर्वाद सदैव राहतो. 
 
कात्यायनी देवीचे व्रत आणि पूजा केल्याने अविवाहित मुलींच्या विवाहातील अडथळे दूर होतात तसेच वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होते.
 
संध्याकाळ हा कात्यायनी देवीच्या पूजेची योग्य वेळ आहे. या वेळी धूप, दिवा, गुग्गुल लावून देवीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. जे भक्त देवीला पाच 
 
प्रकाराची मिठाईचे नैवेद्य दाखवून कुमारिकांना प्रसादाचे वाटप करतात देवी आई त्यांच्या उत्पन्नातील अडथळे दूर करते आणि ती व्यक्ती आपल्या मेहनतीनुसार आणि 
 
क्षमतेनुसार धन मिळवण्यात यशस्वी होते.
 
समोर चित्र किंवा यंत्र ठेवून कात्यायनी देवीची रक्तपुष्पाने पूजा करावी. जर चित्रात यंत्र उपलब्ध नसेल तर दुर्गा  देवीचे चित्र ठेऊन खालील मंत्राचा 51 वेळा जप करावा याने 
 
मनोकामना पूर्ण होईल आणि संपत्तीही मिळेल.
 
पूजा कशी करावी - कात्यायनी देवी पूजा
 
संध्याकाळच्या वेळी पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करून माँ कात्यायनीची पूजा करावी.
 
देवीला पिवळी फुले अर्पित करावी आणि पिवळा रंगाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
 
आईसमोर दिवा लावावा.
 
यानंतर 3 गुठळ्या हळदही अर्पण करावी.
 
मां कात्यायनीला मध अर्पण करावे.
 
मध चांदीच्या किंवा मातीच्या भांड्यात अर्पण केल्यास अधिक योग्य ठरेल. यामुळे प्रभाव आणि आकर्षण वाढेल.
 
आईला सुगंधी फुल अर्पण केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होते तसेच प्रेमसंबंधातील अडथळेही दूर होतात.
 
यानंतर आईच्या समोर मंत्रांचा जप करावा.
मां कात्यायनी मंत्र- katyayani Mantra 
 
मंत्र- 'ॐ ह्रीं नम:।।'
 
मंत्र- चन्द्रहासोज्जवलकराशाईलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी।।
 
मंत्र- ॐ देवी कात्यायन्यै नमः॥
 
मं‍त्र- 'कात्यायनी महामाये, महायोगिन्यधीश्वरी।
नन्दगोपसुतं देवी, पति मे कुरु ते नमः।।'

Edited by: Rupali Barve