मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (16:09 IST)

Vivo X70 Pro & Plus लाँच, शानदार फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

Vivo X70 मालिकेचे दोन जबरदस्त स्मार्टफोन भारतात आज लाँच झाले आहे. Vivo X70Pro आणि Vivo X70 Pro Plus हे दोन फोन लाँच करण्यात येत आहेत. 
 
Vivo X70 Pro Plus आणि Vivo X70 Pro सीरीजमध्ये ZEISS ट्यून्ड कॅमरा देण्यात येत आहे. हा कॅमरा Vivo आणि ZEISS टीम्सने मिळून तयार केला आहे.
 
किंमत बद्दल सांगायचं तर Vivo X60 Pro Plus हा 69,990 रुपये तर Vivo X70 Pro Plus याहून अधिक किंमतीत मिळू शकेल.
 
Vivo X70 Pro Plus हा पहिला स्मार्टफोन असेल जो स्नॅपड्रॅगन 888 प्लस प्रोसेसरसह सादर केला जाईल. यात 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन QHD आहे. रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच, क्वाड-रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक सेन्सर 48 मेगापिक्सलचा आहे. दुसरा 50 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे. तिसरा 12 मेगापिक्सेलचा आहे. चौथा 8 मेगापिक्सेलचा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 55W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
 
Vivo X70 Pro बद्दल बोलायचे झाले तर त्यात MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर दिला जाईल. यात 6.56-इंच फुल-एचडी + एमोलेड डिस्प्ले असेल. एक क्वाड-रियर कॅमेरा देखील आहे ज्याचे प्राथमिक सेन्सर 50 मेगापिक्सेल आहे. दुसरा 12 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे. तिसरा 50 मेगापिक्सेल आहे. चौथा 12 मेगापिक्सेलचा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4450mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.