रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

व्होडाफोन आयडिया आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 'न्यू इयर ऑफर'

व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी 'न्यू इयर ऑफर' लॉन्च केला आहे. माहितीनुसार या ऑफरमध्ये, कंपनी ग्राहकांना रिचार्ज करण्यासाठी 30 रुपयांचा ऍमेझॉन पे व्हाऊचर देत आहे. वापरकर्ता इच्छानुसार ऍमेझॉन वेबसाइटवर ऍमेझॉन पेच्या रकमेद्वारे मोबाइल किंवा डीटीएच रिचार्ज करू शकतात. त्यांच्याकडे विजेचे बिल भरण्याचा पर्याय देखील असेल. नवीन ऑफरचा फायदा मिळविण्यासाठी ग्राहकांना किमान रु. 95 चा रिचार्ज करणे आवश्यक आहे. तथापि, ऍमेझॉन पे व्हाऊचर असलेल्या ग्राहकांसाठी, 95 रुपयांचा रिचार्ज किंमतीनुसार 65 रुपयांचा होईल.    
 
न्यू इयर ऑफर अंतर्गत, व्होडाफोन आयडिया त्या सर्व ग्राहकांना 30 रुपये ऍमेझॉन पे व्हाऊचर देईल जे कमीतकमी रु. 95 चा रिचार्ज करतात. ऍमेझॉन.इन द्वारे या व्हाऊचरचा वापर केला जाऊ शकतो. लक्षात घेण्यासारखे म्हणजे व्होडाफोनसह आयडियाच्या सर्व ग्राहकांना देखील ऍमेझॉन पे व्हाऊचर मिळविण्याची संधी मिळेल. दोन्ही कंपन्यांच्या प्रीपेड ग्राहकांना कमीत कमी रु. 9 5 चा रिचार्ज करावा लागेल. ही ऑफर 10 जानेवारी पर्यंत उपलब्ध आहे.
 
व्होडाफोन आणि आयडियाच्या वेबसाइटवर रिचार्ज पर्याय निवडल्यानंतर आम्हाला सध्यातरी न्यू इयर ऑफरची झलक मिळाली नाही. या वर्षी जुलैमध्ये व्होडाफोनने ऍमेझॉन इंडियाबरोबर भागीदारी केली होती. त्यात ऍमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन खरेदीसाठी व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांना 50 टक्के सवलत मिळायची. दुसरीकडे, ही टेलिकॉम कंपनी व्होडाफोन रेड पोस्टपेड प्लॅनचा वापर करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऍमेझॉन प्राइम सदस्यता देत आहे.