बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

व्होडाफोन प्रीपेड कस्टमर्सला 100 टक्के कॅशबॅक, काय आहे ऑफर जाणून घ्या

दूरध्वनी उद्योगात भांडवल सुरू झाल्यामुळे ग्राहकांना लुभावण्यासाठी कंपन्या स्वस्त रिचार्ज पॅक आणि आकर्षक ऑफर देत आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या '100 टक्के कॅशबॅक' ऑफरप्रमाणेच आता व्होडाफोन देखील निवडलेल्या प्रीपेड रिचार्जवर 100% कॅशबॅक देत आहे. हे कॅशबॅक 50 रुपये कूपन म्हणून उपलब्ध होईल, जी पुढील रिचार्जवर वापरला जाऊ शकतो. 
 
कॅशबॅक ऑफर केवळ 399 रुपये, 458 रुपये आणि 509 रुपये रिचार्जिंगवर दिले जाईल. रिचार्ज केल्यानंतर, कूपन आपल्या मायव्होडाफोन अॅप खात्यामध्ये जमा केला जाईल. 399 रुपये रिचार्ज केल्यानंतर 50 रुपयांचे 8 कूपन, 458 रुपये रिचार्जवर 9 आणि 509 रुपये रिचार्जवर 10 कूपन देण्यात येतील. व्होडाफोनचा हा ऑफर निवडक सर्कलमध्ये 199 रुपये रिचार्जवर दिला जात आहे. 
 
हिमाचल प्रदेशात व्होडाफोन वापरकर्त्याला केवळ 458 रुपये रिचार्जवर कॅशबॅक लाभ मिळेल. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे बिहार, झारखंड, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सर्कलमध्ये 399 रुपयांची योजना 409 रुपयांमध्ये, 458 रुपयांची योजना 459 रुपयांमध्ये आणि 509 रुपयांची योजना 529 रुपये मध्ये मिळेल. लक्षात ठेवा की 399 रुपये, 458 रुपये आणि 509 रुपयांचे रिचार्ज पॅकमध्ये प्रत्येक दिवशी 1.4 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज मिळतात. या योजना अनुक्रमे 70 दिवस, 80 दिवस आणि 90 दिवस वैधतेसह येतात.