रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: रविवार, 4 ऑगस्ट 2024 (16:58 IST)

लक्ष्य सेन उपांत्य फेरीच्या सामन्यात एक्सेलसेनकडून पराभूत,सोमवारी कांस्यपदकासाठी आव्हान

भारतीय पुरुष एकेरी खेळाडू लक्ष्य सेन डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाला आणि अंतिम फेरी गाठण्यास मुकला. लक्ष्य आता सोमवारी कांस्यपदकासाठी आव्हानाला समोर जाणार 
 
सामना हरल्यानंतर लक्ष्य म्हणाला, हा मोठा सामना होता, पण मला थोडे सावधपणे खेळावे लागले. दुसऱ्या गेममध्ये मी चांगली सुरुवात केली आणि आघाडी घेतली, पण ती राखता आली नाही. सुरुवातीपासून ज्या पद्धतीने खेळ सुरू होता, त्यात ऍक्सलसेन आक्रमक खेळत होता आणि मी बचावात्मक खेळ करत होतो. मला वाटतं की मी अटॅक खेळायला हवं होतं. आता मी कांस्यपदकासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन. या सामन्याकडून मला खूप अपेक्षा आहेत. प्रेक्षकांनी मला खूप प्रोत्साहन दिले आणि माझे आई-वडीलही इथे आहेत, त्यामुळे मला धीर आला. आता मी कांस्यपदासाठी प्रयत्न करेन. 
 
लक्ष्यने सामन्याची शानदार सुरुवात केली होती, परंतु एक्सेलसेनने दोन्ही गेममध्ये भारतीय खेळाडूवर मात केली आणि त्याने लक्ष्यचा 22-20, 21-14 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 
लक्ष्यचा कांस्यपदकासाठी सातव्या मानांकित मलेशियाच्या जिया जी लीशी सामना होईल. सोमवारी दोन्ही खेळाडूंमध्ये कांस्यपदकासाठी लढत होणार आहे. 
 Edited by - Priya Dixit