1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परीक्षेची तयारी
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (12:56 IST)

BMC च्या शाळांना ऑफलाइन परीक्षा घेण्याची परवानगी

मुंबई महानगरपालिकेने विविध शिक्षण मंडळांना ऑफलाइन परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात राज्य मंडळासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांचा समावेश आहे. 
 
केम्ब्रिज बोर्ड इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित करू शकते तर अन्य बोर्ड म्हणजेच राज्य मंडळ, सीबीएसई, आयबी, आयसीएसई हे बोर्ड घोषित केलेल्या आणि घोषणा करणार असलेल्या अशा सर्व दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेऊ शकतात.
 
आरोग्यविषयक सर्व खबरदारीचे उपाय, स्वच्छता, सुरक्षेसंबंधी मार्गदर्शक तत्वे आदींचे शाळांनी काटेकोर पालन करावयाचे आहे. केंम्ब्रिज बोर्डाच्या नववी ते बारावीच्या फेब्रुवारी-मार्च सत्राच्या काही विषयांच्या परीक्षा २३ जानेवारीपासून सुरू होत आहेत.