बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परीक्षेची तयारी
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (13:18 IST)

परीक्षा देताना या सावधगिरी बाळगा

परीक्षेच्या तारखांची यादी येताच विद्यार्थ्यांवर एक ताण दिसू लागतो. विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या कामगिरीसाठी आपले पुरेपूर जोर लावतात. पण बऱ्याच  वेळा असे काही होतं, की शेवटच्या तासात एखादी नकळत झालेली चूक त्यांना अडचणीत आणते. 
 
* हॉल तिकीट न घेता केंद्रावर जाणं -
आपण आपल्या विषयाची तयारी अगदी चांगल्या प्रकारे केलेली आहे, पण शेवटच्या तासातच आपण हॉल तिकीट न घेतातच परीक्षेच्या केंद्रावर पोहोचता. तर आपल्याला नैराश्य येत. आपण परीक्षेला गेल्यावर समजत की आपले प्रवेशपत्र गहाण झालेले आहे, तर आपण न घाबरता हे परीक्षा पर्यवेक्षकाला कळवावे आणि त्यासाठी लेखी अर्ज देऊन त्यांना पुन्हा प्रवेश पत्र देण्यास सांगावे. आपण त्यांच्या कडूनच परीक्षेला बसण्यासाठीची परवानगी घ्यावी. याच सह केंद्राच्या इंव्हेजिलेटरला देखील याची माहिती अर्जाद्वारे द्यावी.
 
* फोटो कापी जवळ बाळगा - 
आपण आपल्या हॉल तिकीटाची कॉपी जवळ बाळगा. या सह आपण घरात देखील त्याची एक प्रत ठेवा आणि घराच्या सदस्यांना या बद्दल सांगून ठेवा की आपण ती कोठे ठेवली आहे. फोटो कॉपी असल्याने आपल्याला परीक्षेत प्रवेश घेण्यास अनुमती मिळेल. परीक्षा दिल्यावर केंद्राला एक लेखी अर्ज द्या की दुसऱ्या दिवशी आपण हॉल तिकीटाची मूळ प्रत घेऊन येणार. किंवा आपण आपल्या पालकांना परीक्षा संपण्यापूर्वी प्रवेश पत्र घेऊन यायला सांगा. 
 
* प्रश्न पत्र उशिरा मिळाल्यावर -
आपण परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचला आहात आणि आपल्याला परीक्षा प्रश्नपत्र उशिरा मिळाल्यावर ताण येणं साहजिकच आहे. अशा परिस्थितीत  आपण इंव्हेजिलेटर ला सांगा की त्यांनी आपल्याला अतिरिक्त थोडा वेळ द्यावा. आपले उशिरा येण्याचे कारण योग्य असल्यास आपल्याला अतिरिक्त वेळ मिळू शकेल.
 
* आपल्या जवळ कोणते ही कागद बाळगू नका -
परीक्षा कक्षात कोणते ही कागद आपल्या जवळ पडलेले असल्यास तर याची सूचना त्वरितच इंव्हेजिलेटरला द्या. 
असे केले नाही तर आपल्याला याचे दोषी मानतील आणि आपल्या विरुद्ध कोणतीही कृती केली जाऊ शकेल. एकंदरीत, परीक्षेला जाण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करा जेणे करून आपल्याला काहीच अडचण होणार नाही.