Dharma Sangrah
✕

१८ तासानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

Updated: शनिवार, 14 जानेवारी 2023 (15:22 IST)
 
दरम्यान, यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे हे आंदोलक विद्यार्थी आज त्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
 
पुण्यामधील अलका टॉकी चौकामध्ये विद्यार्थ्यांचे गेल्या १८ तासापासून आंदोलन सुरु होते. आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिस सातत्याने समजवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये येणार आहेत, त्यांना तुम्ही एक शिष्टमंडळ घेऊन भेटण्याचा प्रयत्न करा असे देखील पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. परंतु, तरी देखील विद्यार्थ्यांनी रात्रीच्या एवढ्या थंडीमध्ये आंदोलन सुरुच ठेवले होते. जवळपास ७०० विद्यार्थी रस्त्यावर बसून होते. परंतु, पोलिसांच्या आवाहनानंतर आता विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले आहे.
 
“या” शहरात सुरु होते आंदोलन
जोपर्यंत आयोग नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करणार असल्याची मागणी पूर्ण करुन नोटीफिकेशन काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला नोटीफिकेशन काढण्याचे आदेश द्यावे, असे देखील विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह राज्यामधील प्रमुख शहरात या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा १७ नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा इशारा

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO ला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद; अँकर बुकमध्ये 30 पटांहून अधिक मागणी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कर्करोग रुग्णांना सरकारी योजनेतून पीईटी-सीटी स्कॅनची सुविधा मिळणार

LIVE: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा १७ नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा इशारा

९०० किलो सोने! १५,००० महिलांनी १,३०० कोटी रुपये किमतीचे दागिने घालून रास गरबा केला

पुढील लेख
Show comments