मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 14 जानेवारी 2023 (14:22 IST)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी

nitin
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. नागपूर येथील कार्यालयात लँडलाईन फोनवर अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या वतीने नागपूर पोलिसांना तक्रार देण्यात आली आहे.  
 
नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयात फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. नितीन गडकरी यांच्या नागपूर जनसंपर्क कार्यालयाच्या लँडलाईन क्रमांकावर तीन वेळा धमकीचे फोन आले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून नितीन गडकरी यांना तीन वेळा धमकीचे फोन आले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दाऊदच्या नावाने धमक्या देण्यात आल्या आहेत. धमकीचा फोन येताच गडकरींच्या नागपूर कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.कर्नाटकातील काही भागातून हा कॉल करण्यात आला होता. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.फोन करणाऱ्याने खंडणीही मागितली आहे.
 
Edited By- Priya Dixit