राज्य सरकारची मोठी योजना, आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन घेता येणार
राज्य सरकार ने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरु केल्या नंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत देवदर्शन सुरु करण्याची योजना आखत आहे.महाराष्ट्रातील 65वर्षांवरील नागरिकांना 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला होता. या योजनेला ज्येष्ठ नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्या नंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत देवदर्शन घडवण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाली आहे. या योजनेनुसार आता एसटी महामंडळाच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्री भेट देता येणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला या संदर्भात योजना आखण्याचे आदेश दिले असून लवकरच या बाबत निर्णय जाहीर केले जातील. ज्येष्ठ नागरिक प्रत्येक शनिवार आणि रविवार मोफत देवदर्शन करू शकणार आहे. या साठी एसटी महामंडळाकडून तब्बल 2000 बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी आहे.
ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनासाठीचा प्रवास मोफत होणार असून त्यांना राहण्याचा आणि जेवण्याचा खर्च स्वतः करावा लागणार. ज्येष्ठ नागरिकांसाठी यात्री निवास आणि धर्मशाळेत राखीव खोल्या ठेण्यात येणार.
पंढरपूर-तुळजापूर-अक्कलकोट, अष्टविनायक दर्शन, शिर्डी, शेगाव, कोल्हापूर, ज्योतिबा दर्शन आदी तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याकरता हा प्रवास मोफत करता येईल. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची चर्चा सध्या रंगत आहे.
Edited By- Priya Dixit