सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (11:18 IST)

पुण्यात 2 गटांमध्ये वाद, भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी

Freestyle street fights in Pune :पुण्यात दोन गटात हाणामारीचा धक्कादायक प्रकार घडला आहे .ही घटना येरवडाच्या शिवराज चौकातील आहे. या ठिकाणी दोन गटात जागेच्या वादातून दोन गटात भररस्त्यात फ्री स्टाईलमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत मुक्तारसिंग भादा सह इतर काही जण जखमी झाले आहेत. मारामारी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे.   
 
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मध्ये काही लोक हातात काठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहे. तर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांपैकी काही महिला भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांचा गुन्हेगारावर वचक नसल्याचे नागरिक बोलत आहेत. येरवडा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देखील काम करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.