गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जून 2022 (15:57 IST)

Pune Minor Girl Rape Case: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

rape
अल्पवयीन मुलीसह प्रेम संबंध करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे परिसरात घडली आहे. या घटनेतून ती गर्भवती असल्याचे समजले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका 23 वर्षीय तरुणावर गुन्हा नोंदवला आहे. राकेश निरगुनकर असे आरोपीचे नाव आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील इस्टेट भागातील रहिवासी एका 17  वर्षीय तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तरुणीने सांगितले की करमोळी, तानाजी पाटीलनगर, पौड येथे राहणाऱ्या एका तरुणाने फिर्यादीशी ओळख केली आणि नंतर प्रेम संबंध निर्माण केले. नंतर तरुणीला माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याशी लग्न करेन असे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. नंतर अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिली आणि तरुणाने लग्नाला नकार दिल्यावर अल्पवयीन मुलीने पोंड पोलीस ठाण्यात या प्रकरणात आरोपी राकेश निरगुनकरच्या विरोधात तक्रार नोंदवली असून प्रकरण वारजे पोलीस ठाण्यात स्थलांतरित करण्यात आले. या प्रकरणात वारजे पोलिसांनी आरोपी राकेशच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून तपास करत आहे.