Marathi Biodata Maker
✕

अखेर शरजिल उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल

Updated: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (07:46 IST)
 
३० जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोलीस परवानगीनुसार, एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती.  या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी याला भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संघराज्य व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक विधाने केली होती. शरजिल उस्मानी याने एल्गार परिषदेत ''हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरिके से सड़ चुका है'' आणि भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत ''मी भारतीय संघराज्य मानत नाही'', अशी प्रक्षोभक विधाने केली होती. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊ लागला होता.नुकत्याच पुण्यात आयोजित झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १५३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, भरती परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवली

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? मुंबई उच्च न्यायालयाने सरकारकडून मागवला तपशील

CBSE ने इयत्ता १०वी ते १२वीच्या प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक जाहीर केले

दिवाळीपूर्वी हीरोची १.१६ लाख रुपये किमतीची बाईक लॉन्च

विजय वडेट्टीवार यांनी कर्जमाफीवरून सरकारवर हल्लाबोल केला

पुढील लेख
Show comments