बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (07:42 IST)

बाप्परे, अल्पवयीन आरोपीने क्राईम पेट्रोल मालिका पाहून अतिशय थंड डोक्याने केला खून

जानेवारीच्या अखेरीस पुण्यातील कोथरूड परिसरात १४ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. अखेर कोथरूडमध्ये अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी उलगडा करण्यात तपास पथकाला यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे क्राईम पेट्रोल पाहून खून करण्याची कल्पना सुचल्याची आरोपीने कबुल केले आहे. 
 
पकडा-पकडी खेळत असताना दोन वेळा राज्य आल्यामुळे रागातून त्याने मित्राला डोक्यात मारले. त्यामुळे तो खाली पडल्यानंतर अल्पवयीन मित्राच्या डोक्यात सिमेंटचा दगड मारून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीने क्राईम पेट्रोल मालिका पाहून अतिशय थंड डोक्याने खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
पुण्यातील कोथरूड परिसरात एका 14 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला होता. कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विश्वजीत वंजारी (वय 14) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. दोन दिवसांत पोलिसांनी या खूनाचा तपास करून अल्पवयीन आरोपीला अटक केले आहे.