बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (07:35 IST)

11 वर्षाच्या विश्वजितचा डोक्यात मारहाण करून खून

पुण्यातील कोथरुड परिसरात एका 11 वर्षाच्या मुलाचा डोक्यात मारहाण करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याबाबत कोथरुड पोलिसांकडे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
विश्वजित उर्फ विशु विनोद वंजारी (11, रा. केळेवाडी, कोथरूड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
 
विश्वजीत हा केळेवाडी परिसरात राहात होता. दरम्यान तो गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध कोथरुड पोलीस घेत होते.  यावेळी त्याच्या डोक्यात मारहाण केली असल्याचे दिसून आले आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी संशयित काहीजणांना पकडले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू केकी असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान त्याचा खून शेजारी राहणाऱ्याच व्यक्तींनी केला असल्याचे बोलले जात आहे.