बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (16:24 IST)

ट्रॅफिक हवालदाराला बेदम मारहाण, या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी

मुंबईत एका ट्रॅफिक हवालदाराला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई केलेल्या हवालदाराला एका महिलेने बेदम चोप दिला आहे. या हवालदाराने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा ही महिला करत आहे. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संबंधित महिलेवर कारवाईची मागणी केली आहे. 
 
या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी, हा मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे. याबाबतचा एक व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे.
 
मुंबईतील काळबादेवी परिसरात ट्रॅफिक हवालदाराने एका महिलेने वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई केली. या कारवाईदरम्यान त्या हवालदाराने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. या व्हिडीओत महिला  आणि तिच्या साथीदाराकडून वारंवार शिवीगाळ का केली? असा जाब विचारला आहे.  त्यानंतर त्या महिलेने या व्हिडीओत हवालदाराची कॉलर पकडत मारहाण केली. तसेच त्या हवालदाराचे कपडेही फाडले.