बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 2 जानेवारी 2021 (17:32 IST)

बाप्परे, नवीन वर्षाच्या पार्टीला गेलेल्या तरुणीची हत्या

नवीन वर्षाचे स्वागत होत असतानाच गुरुवारी रात्री उशिरा मुंबईतील खार येथील 60 रोड, भगवती हाईट्स इमारतीमध्ये जान्हवी कुकरेजा (19) या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.  या तरुणीची हत्या झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणी श्री जोगधनकर आणि दिया पेडणेकर या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. 
 
जान्हवी ही सांताकू्रझमध्ये राहात असून ती एसवाय बीकॉमध्ये शिकत होती. तिचा एक मित्र भगवती हाईट्स इमारतीमध्ये राहतो. त्याच्या आग्रहाखातर ती त्याच्या राहत्या इमारतीमध्ये नवीन वर्षानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीसाठी गेली. या पार्टीमध्ये चौदा ते पंधरा तरुण-तरुणी सहभागी झाले. यातील बहुतांश तरुण-तरुणींनी मद्यप्राशन केले होते.
 
सकाळी जान्हवी इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची एका रहिवाशाच्या निदर्शनास आली. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना ही माहिती दिली. खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जान्हवीला तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. जान्हवीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.