Festival Posters

ओव्हरटेक करणे बाइकस्वाराला महागात पडले

सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (11:15 IST)
Pune Maval Accident :तरुणांमध्ये वाहनचालवताना स्टंट करण्याचा नाद असतो. या नादात  ते वाहनचालवताना शिस्त पळत नाही. अशामुळे  ते अपघाताला बळी पडतात. पुण्यात एका बाइकस्वाराला ओव्हरटेक करणे महागात पडले. हा चित्तथरारक अपघात कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 
 
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगांव - चाकण रोड वर हिरोहोंडा बाईकवरुन बाळू शिळवणे हा तरुण जात होता. तो एका कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता. रस्त्याच्या पूर्णपणे बाजूला आलेली त्याची बाईक तो पुन्हा ओव्हरटेक करुन डाव्या लेनमध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता. पण इतक्यात समोरुन येणाऱ्या कारच्या वेगाचा त्याला अंदाज आला नाही. डाव्या लेनमध्ये बाईक आणण्याच्या आधीच समोरुन येणाऱ्या कारच्या उजव्या बाजूला त्याच्या बाईकचा धक्का लागतो आणि दुचाकीस्वार बाळू शिळवणे हा तरुण जागीच कोसळतो. कंटेनरच्या खाली येतो की  काय अशी धडकी ज्याने हे अपघात पहिले त्याच्या मनात भरली.पण नशीब बलवत्तर म्हणून हा सुदैवाने थोडक्यात बचावला.
<

#Pune | कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात कैद झाला काळाजाचा ठोका चुकवणारा अपघात, पाहा व्हिडीओ, बाय द वे... दुचाकीस्वार वाचलाय.. पण जखमी आहे.. कशाला करायचं ओव्हरटेक.. गाडी समोर दिसत असतानाही.. #ACCIDENT #cctvfootage pic.twitter.com/94vkJxV3al

— Siddhesh Sawant (@ssidsawant) August 22, 2022 >
कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ कैद झाला आहे. 
बाळू या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा वर गुन्हा दाखल केला आहे. 
 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: उद्या २८ जून २०२६ रोजी होणारी TET परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली

Maha TET Paper Leak: टीईटीचा पेपर कुठून लीक झाला? पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले

सियाला शिक्षा होणार का? "तिला गुन्हा करताना कोणी पाहिलं?", केतन हत्या प्रकरणात वकिलाने मोठा दावा केला

परीक्षेच्या एक दिवस आधी TETचा पेपर फुटला, उद्याची परीक्षा रद्द

शिवसेना यूबीटी भाजपसोबत हातमिळवणी करणार? विमानात फडणवीसांशी झालेल्या संभाषणाबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले....

पुढील लेख
Show comments