Daily Horoscope
✕

पोटनिवडणुकीसाठी कसबा मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश

Updated: बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (13:52 IST)
 
कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक, दत्तवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.
 
पोलीस दल,संरक्षण दल, कारागृह विभाग, बँक सुरक्षा विभाग, अन्य केंद्रीय, शासकीय कर्मचाऱ्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. शस्त्र बाळगण्याचा परवाना असलेल्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱयांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिले.
 
सभेसाठी परवानगी बंधनकारक
 
सार्वजनिक रस्ता, ठिकाणी सभा घेण्यास पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ध्वनीक्षेपकाचा वापर रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत करण्यास मनाई करण्यात आली आहे. फिरत्या वाहनावरुन ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

Hyundai Bayon ११ हजारात हुंडईची भन्नाट SUV बुक करा, 'किलर' लुक अन् भन्नाट फीचर्स; बघून व्हाल फिदा!

आयसीसी महिला पंच आणि झिम्बाब्वेच्या माजी वेगवान गोलंदाज सारा डंबनेवाना यांचे निधन

महाराष्ट्रात पाणी कपातीचे संकट; तुमच्या शहरात पाणीपुरवठ्याचे काय नियोजन?

"ते हुकूमशाही करत आहे," वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकाने गंभीर आणि सहकाऱ्यांवर टीका केली

शेतकरी कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने करावयाची कामे

पुढील लेख
Show comments