suvichar
✕

पुणे : इराणी चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले

Updated: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (09:10 IST)
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, खडक पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी हद्दीतील सराईत गुन्हेगारांची तपासणी करत होते. यावेळी त्यांना दुचाकी चोरणारा एक आरोपी नातूबाग मैदान या ठिकाणी थांबला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नातूबाग मैदान परिसरात सापळा रचून झडप घालून आरोपीला पकडले.
 
परंतु पोलीस आमदाराच्या हाताला झटका मारून त्याने पळ काढला होता. त्यानंतरही पोलिसांनी काही अंतर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ असलेल्या दुचाकी विषयी चौकशी केली असता त्यांनी ती शुक्रवार पेठेतील शिंदे आळी परिसरातून चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यानंतर गुन्हा दाखल करून त्याची पोलिस कोठडी घेतली.
 
पोलीस कोठडीत त्याने चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अटकेत असलेला आरोपी हा इराणी असून चेन स्नॅचिंग करण्यासाठी त्याने या दुचाकी चोरल्याचे सांगितले. खडक पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे करीत आहेत.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सागरी उद्योगातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनेल

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा: महत्त्वाच्या तारखा, परंपरा आणि भाविकांसाठी माहिती

WhatsApp स्टोरेज भरले आहे? जागा मोकळी करण्याचे मार्ग

नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा इशारा! 'या' जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा!

कांद्याच्या दरात पुन्हा तेजी; ग्राहक आणि शेतकऱ्यांसाठी पुढे काय?

पुढील लेख
Show comments