suvichar
✕

मुलगा मोबाईल आई गळफास आणि खून वाचा पुणे येथील घटना

Updated: सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (20:58 IST)
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथे जय मल्हार रस्ता परिसरात तस्लिम जमीर शेख या पती व एका मुलासोबत राहत होत्या. त्यांनी बुधवारी (ता. १५) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला होता. तेव्हा तस्लिम यांचा गळा दाबून व डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 तारखेला उरळी कांचन भागात एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी प्राथमिक शवविचछेदन अहवालासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित महिलेचा गळा दाबून आणि डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
 
पोलिसांनी आपला तपास त्या दिशेने वळवत कुटुंबियांची चौकशी केली. त्यात मुलगा जीशान (वय. १८) याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. जीशान हा बारावीला आहे, हा अभ्यास करत असताना मोबाईल त्याच्या आईने त्याला मोबाईल पाहतो म्हणून रागवून मारलं होतं. याचा राग अनावर झाल्याने जिशानने त्याच्या आईला भिंतीवर ढकलले आणि तिचा गळा दाबून खून केला. घाबरलेल्या जिशनने त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून आईच्या हाताची नस कापली मात्र रक्त न आल्याने त्याने मृतदेहाला पंख्याला लटकवले आणि तिने आत्महत्या केली असा बनाव केला.
 
दरम्यान, आरोपी मुलगा जिशान जमीर शेख याला लाेणीकाळभाेर पाेलिसांनी अटक केले आहे. त्याच्या विराेधात पाेलिस उपनिरीक्षक अमाेल घाेडके यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पाेलिसांनी आराेपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट, अधिकारी लंडन दौऱ्यावर? आदित्य ठाकरेंचा उदय सामंत यांना सवाल

LIVE: दुष्काळाच्या काळात अधिकाऱ्यांच्या लंडन दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उदय सामंतांना प्रश्न

खाजगी ट्रॅव्हल्समधून अवैध वसुली केल्याप्रकरणी एपीआय रवींद्र शेडगे यांचे निलंबन

चंद्रपूर येथील सैनिक शाळेतील पाचवीच्या एका विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वे कडून अनेक गाड्या रद्द

पुढील लेख
Show comments