suvichar
✕

पुण्यात मतदानाचा नवा विक्रम, एवढ्या टक्क्यांनी मतदान वाढले

Updated: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024 (11:24 IST)
ALSO READ: गिरीराज सिंह यांचा मोठा दावा, यावेळी महाराष्ट्र-झारखंडमध्ये डबल इंजिनचे सरकार येणार
गेल्या विधानसभा निवडणुकीत ५४.७४ टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत यंदा पुणे जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यावेळी पुणे जिल्ह्यात सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता वाढलेली टक्केवारी महायुतीला पडते की महाविकास आघाडीला हे पाहायचे आहे. हे जाणून घेण्यासाठी आता सर्वांच्या नजरा शनिवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत.
 
ALSO READ: ठाण्यामध्ये मतदान केंद्रावर 113 वर्षीय वृद्ध महिलेने केले मतदान
पुणे जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्राच्या तुलनेत दुपारच्या सत्रात मतदानाचे प्रमाण वाढले. सकाळी मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली होती, मात्र मतदान केंद्रावर अपेक्षेपेक्षा कमी गर्दी होती.
 
सकाळी ७ ते ९ या वेळेत सरासरी साडेपाच टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर हळूहळू दर दोन तासांनी ही आकडेवारी वाढत गेली. मात्र, दुपारी तीननंतर मतदान केंद्रावरील गर्दी वाढली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ५४.०९ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत मतदारांची संख्या ८८ लाख ४९ हजार ५९० असल्याचे सांगण्यात येत आहे.
ALSO READ: नागपुरात मतदानानंतर ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या गाडीवर हल्ला, व्हिडिओ वायरल
यावेळी कोथरूड आणि मंगळवार पेठेतील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना अडचणींचा सामना करावा लागला. याशिवाय तृतीयपंथीयांनीही मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. त्याचबरोबर सकाळी मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी 'घे भरारी' आणि ग्राहक पेठेतर्फे मोफत चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

LIVE: नवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन पाळत आणि सहा ठिकाणी नाकाबंदीसाठी

महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; पदोन्नतीसाठी असलेली ५० वर्षांची वयोमर्यादा रद्द

नवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन पाळत आणि सहा ठिकाणी नाकाबंदी

हुथी बंडखोरांचा सौदी अरेबियाच्या रियाध विमानतळावर मोठा हल्ला, १२ ठार ३०० हुन अधिक जखमी

मी माझ्या गावी जात आहे, सुटकेनंतर अभिजीत दीपकेची पोस्ट, सीजेपी मागे हटणार नाही

पुढील लेख
Show comments