शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (13:35 IST)

सीएम चन्नी यांच्या वक्तव्यावर नितीश कुमार संतापले, म्हणाले- काँग्रेसने कोणाला संधी दिली माहीत नाही

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्लीत पोहोचले. येथे त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. चन्नी यांच्या 'भैय्या' या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नितीश कुमार म्हणाले की पक्षाने कोणत्या व्यक्तीला संधी दिली आहे हे काही कळत नाही. ते म्हणाले की या प्रकारे बोलून त्यांनी स्वतःचे नुकसान केले आहे.

झाले असे की एका रोड शोदरम्यान चन्नी म्हणाले होते की, बिहार-यूपीचा 'भैया' पंजाबमध्ये येऊन राज्य करू शकत नाही. प्रियांका गांधी या पंजाबच्या सून आहेत.
 
सीएम नितीश म्हणाले की चन्नी यांनी अत्यंत चुकीचे विधान केले आहे. कारण बिहारचे किती तरी लोक पंजाबमध्ये राहतात आणि तेथील लोकांची सेवा करतात. काही परदेशात जाऊन देखील त्यांचे काम सांभाळतात. बिहार किती महत्त्वाचे आहे हे समजले पाहिजे. गुरु गोविंद सिंग बिहारमध्येच जन्माला आले. प्रत्येक वेळी पंजाबचे लोक किती मोठ्या संख्येने बिहारमध्ये येतात. तेव्हा येथील लोक त्यांचे स्वागत करतात.
 
350 व्या प्रकाश उत्सवाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, 2017 मध्ये किती मोठा कार्यक्रम झाला हे सर्वांनी बघितले आहे. त्यानंतरही हा कार्यक्रम अखंड सुरूच आहे. लोक किती आनंदी आहेत? आता चन्नी कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे हे तर मला माहीत नाही. पक्षाने कोणाला संधी दिली आहे, याची त्यांना कल्पना देखील नाही. असे बोलून त्याने आपलेच नुकसान केले आहे.