1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (16:09 IST)

सिद्धूच्या पत्नीने चन्नींवर निशाणा साधला

Navjot Kaur Sidhu
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या गरीब पार्श्वभूमीच्या प्रतिमेवर निशाणा साधला. राहुल गांधी यांना चन्नी गरीब समजण्यासाठी दिशाभूल केली गेली तसेच मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे पती आणि पक्षाचे पंजाबचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू हेच योग्य पर्याय ठरले असते, असेही त्या म्हणाल्या.
 
दरम्यान आप ने घोषित केलेल्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भगवंत मान यांनी देखील राहुल गांधींच्या विधानावर स्वतंत्रपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी चन्नी यांना गरीब घरातील सांगितले होते. मान यांनी विचारले की ते कोणत्या एंगलने गरीब आहे.
 
काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून चन्नी यांना पाठिंबा देत आहे. नवज्योत कौर म्हणाल्या की सिद्धू सहा महिन्यांत पंजाबमध्ये बदल घडवून आणण्यासाठी ते एक चांगला पर्याय ठरले असते.
 
नवज्योत कौर यांनी चन्नी आमच्यापेक्षा श्रीमंत असल्याचे म्हटले.