सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:36 IST)

२०२४ ला एकटे लढून १७० आणू : चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

chandrakant patil
भाजप २०२४ ची निवडणूक एकटा लढवेल. राज्यात ४२ ते ४३ खासदार निवडणून आणेल. तसेच विधानसभा निवडणुकीतही विजयी उमेदवारांचा आकडा १६० ते १७० असेल, हे माझं विधान लिहून ठेवा, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयी मिरवणुकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
 
भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने मुंडे कार्यकर्त्यांनी आज बीड-उस्मानाबाद दौऱ्यावर असणाऱ्या प्रवीण दरेकर यांचा गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच निषेधाच्या घोषणाही दिल्या. तर केंद्रीयमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, हल्लेखोर कोण आहेत? हे शोधावे लागेल. जर पंकजा ताईंवर खरे प्रेम करणारे हे कार्यकर्ते असतील तर ते अशी कृत्ये करून पंकजा ताईंची प्रगती रोखत आहेत. पक्ष त्या गोष्टीत हस्तक्षेप करणार नाही, असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले.
 
आमच्या हातात दोन दिवसांसाठी ईडी द्या, फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर बोलताना पाटील म्हणाले, ईडी हातात द्या! फडणवीस सुद्धा मतदान करतील हे राऊतांच वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे.