बुधवार, 6 डिसेंबर 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (18:31 IST)

Shri Ram Navami wishes : राम नामाची ही जादु पहावी आजमावून

ram navami
राम तुझं नाम, मुखी घ्याव वाटे सदा,
दर्शन घडो तुझं हीच मनी कामना सर्वदा,
प्रभाते नित्य राम नामाचा असतो धावा,
सावळ रूप तुझं ,जीव तुझ्यातच वाटे रममाण रे व्हावा,
भक्तिभाव तुझाच माझ्यात  उरावा भरून ,
राम नामाची ही जादु पहावी आजमावून,
राम नामाने  आज अवघी नगरी दुमदुमली,
नवरात्र आहे रामाचे,शुभशकुनाची
लागलीसे चाहूल!
...अश्विनी थत्ते.