शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2024 (17:26 IST)

मोठी बातमी : 10वी- 12वी प्रात्यक्षिक गुण आता ऑनलाईन

exam
10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जाण्याचे प्रकार घडत असल्याची दखल घेऊन राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीपासून प्रथमच प्रात्यक्षिकांचे गुण ऑनलाईन भरण्याचा निर्णय घेतला आहे. ओएमआर गुणपत्रिकांऐवजी ऑनलाईन गुण भरण्याच्या या निणर्यामुळे बनावट गुणास आळा बसणार आहे.
 
राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे तर 10वीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 10 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत होईल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे गुण शिक्षक, प्राचार्यांना www.mahahssboard.in या संकेतस्थळावरील ‘प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड’ लिंकमधून प्रचलित लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर करून नोंदवावे लागणार आहेत.
 
प्रात्यक्षिक व तोंडी श्रेणीअंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीत देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेनंतर ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा घेतली जाईल. अशा विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षेसाठी ज्या-त्या कनिष्ठ महाविद्यालय, शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.