1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 जानेवारी 2024 (13:45 IST)

10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षेला 10 मिनिटे वेळ वाढवून मिळणार

10th 12th Exam Time Extended. Board Exam Time Extended
10th 12th Exam Time Extended: दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता बोर्डच्या या परीक्षेला 10 मिनिट वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही वाढीव वेळ मिळणार आहे.
 
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना दहा मिनिट एक्स्ट्रा मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि ते नीट समजून घेण्यासाठी वेळ वाढवून मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.
 
या निणर्यामुळे मुलांना फायदा होणार आहे. या पूर्वी परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी तसेच परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी 10 मिनिटे आधी केल्या जात होते.
 
10वी आणि 12 वीच्या परिक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले असून या परीक्षेची जोरदार तयारी सुरु आहे. बारावीची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालवधीत होणार आहे. 
 
या परीक्षा या सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात घेतल्या जाणार आहेत. सकाळच्या सत्रात 11 वाजता पेपर सुरू होणार असल्याने मुलांना 10.30 वाजता दालनात हजर राहावे लागणार तर दुपारी 3 वाजता पेपर सुरू होणार असल्याने 2.30 वाजता हजर राहावे लागणार आहे. तसेच 11 च्या पेपरला 2 ऐवजी 2.10 असा वाढीव 10 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.
 
बोर्डाच्या या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जीवनातील एक महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे मुलांसह पालकांना देखील या परीक्षेची काळजी असते. पूर्वी मुलांना उत्तर पत्रिका नीट वाचून समजून घेता यावी तसेच त्याचा अंदाज घेता यावा यासाठी परीक्षा सुरू होण्याच्या आधी प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिकेचे वाटप केले जात होते. मात्र पेपर फुटीच्या घटना घडल्यामुळे निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची पद्धत गेल्या वर्षीपासून रद्द करण्यात आली होती. अशात विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका वाचून पेपर सॉल्व करण्यास उशीर होत होता. मुलांना वेळ कमी पडत असल्याचे लक्षात घेऊन परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर मुलांना आणखी 10 मिनिटे वाढीव वेळ दिला जाणार आहे.