Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन मोठ्या प्रकल्पांत २४.९३ टक्के पाणीसाठा

Updated: सोमवार, 17 जुलै 2023 (09:06 IST)

मृत पाणीसाठा ४७.१३० दशलक्षघनमीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा ४०.८९७ दशलक्षघनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी २३.११ एवढी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा १२१.१८८ दशलक्षघनमीटर आहे. या प्रकल्पात प्रत्यक्ष पाणीसाठा ५५.९४० दशलक्षघनमीटर आहे. मृत पाणीसाठा २९.९६७ दशलक्षघनमीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा २५९७३ दशलक्षघनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी २८.४७ इतकी आहे. या दोन्ही प्रकल्पांत एकुण २४.९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा १७.८१५ दशलक्षघनमीटर असून त्याची टक्केवारी १४.५८ एवढी आहे.
 
मांजरा प्रकल्पाच्या वर महासांगवी आणि संगमेश्वर मध्यम प्रकल्प आहेत. महासांगवी मध्यम प्रकल्प ५.८८ दशलक्षघनमीटर आणि संगमेश्वर मध्यम प्रकल्प १६.८२ दशलक्षघनमीटर साठवण क्षमतेचे आहेत. मांजरा प्रकल्पावरील हे दोन प्रकल्प भरल्याशिवाय मांजरा प्रकल्पात पाणीसाठा होत नाही. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यंदा मात्र प्रकल्प क्षेत्रामध्ये दि. ५ जून रोजी रात्री एकाच दिवशी ५७ मिलीमीटर पाऊस झाला तर आतापर्यंत १७१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रकल्पात ६.८११ मिलीमीटर नवीन पाणीसाठा झाला आहे. दि. ५ जुलै रोजी प्रकल्पीय क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मांजरा नदी वाहती झाली आहे. बॅकवॉटरच्या नाल्याद्वारे प्रकल्पात पाणी आले आहे. मांजरा प्रकल्पावरील पालोट क्षेत्र लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यात आणि लातूर तालुक्यातील हरंगुळपर्यंत आहे. मांजरा आणि डावा, उजव्या कालव्यातून हे पाणी लातूर जिल्ह्यापर्यंत येते. तसेच लातूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पाचे २२ स्क्वेअर चौरस किलो मीटर पाण्याचे क्षेत्र आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

₹300 मध्ये वर्षभरासाठी रिचार्ज करण्याचा त्रास आता संपला! 20 ऑगस्टपासून सबस्क्रिप्शन उपलब्ध; ₹299 चा प्लॅन सुरूच

LIVE: गिरीश महाजन यांची नाशिकचे तर भरत गोगावले यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती

अमरावतीत दोन मोटरसायकलची भीषण टक्कर; लहान बाळासह दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

पालकमंत्री पदाचा वाद अखेर मिटला, गिरीश महाजन यांची नाशिकचे पालकमंत्री तर भरत गोगावले यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती

नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून सख्ख्या दोन बहिणींचा मृत्यू

पुढील लेख
Show comments