शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: दौंड पाटस , सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (09:48 IST)

उसाच्या ट्रॉली अपघातात 3 मृत्यू

accident
रात्रीच्या वेळी उसाने भरलेल्या ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दौंड पाटस अष्टविनायग मार्गावर झाला आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उसाच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसविण्यासाठी पोलिसांकडून अनेक वेळा जनजागृती केली जाते. मात्र, तरीही ट्रॅक्टर चालक आणि मालक याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. याच कारणामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा ट्रॅक्टरचा अंदाज येत आहे.
Edited by : Smita Joshi