Daily Horoscope
✕

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून येण्याची 5 कारणं

Updated: बुधवार, 5 जून 2024 (18:51 IST)
अनेक दिवस टीव्हीवर रंगलेल्या या नाट्याचा परिणाम असा झाला की लोकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबाजूने सहानुभूती तयार झाली.
 
महत्त्वाचं म्हणजे ती सहानुभूती लोकसभा निवडणुकांपर्यंत टिकवण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं.
 
2. भाजपच्याविरोधात गेलेलं वातावरण
उद्धव ठाकरेंना त्यांच्या बाजूने तयार झालेल्या सहानुभूतीचा वापर भाजपच्या विरोधात वातावरण तयार करण्यात करता आला.
 
हे दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेलं आक्रमण असल्याचं भासवण्यात त्यांना यश आलं. त्यात भर पडली ती भाजपनं अजित पवारांना हाताशी धरून पाडलेल्या राष्ट्रवादीच्या फुटीची.
 
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मग भाजपच्या विरोधात वातावरण तयार केलं. त्यात त्यांना संजय राऊत, सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्यांची साथ मिळाली.
3. दलित, मुस्लिम मतदारांची एकजुट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा दिला आणि त्यापाठोपाठ भाजपच्या नेत्यांची वेगवेगळी विधानं यायला लागली. भाजप नेते अनंत हेगडेंनी संविधान बदलण्यासाठी 400 खासदार पाहिजे असल्याचं म्हणून एक प्रकारे विरोधकांच्या हातात आयतं कोलित दिलं.
 
काँग्रेससह सर्व विरोधकांनी हेगडेंच्या वक्तव्याचा आधार घेत भाजप सत्तेत आली तर संविधान बदललं जाऊ शकतं याचा प्रचार केला. राहुल गांधी तर त्यांच्या प्रत्येत रॅलीत संविधानाची प्रत घेऊन जायला लागले. त्याचा थेट परिणाम मुंबईत उद्धव ठाकरे यांनी जिंकलेल्या जागांमध्ये दिसून येतोय.
 
सीएएनंतर मुस्लीम मतदारांमध्ये भाजपच्या विरोधात एक प्रकारे हवा तयार झाली होती. त्यात मोदींच्या हिंदू-मुस्लीम वक्तव्यांची भर पडली आणि महाराष्ट्रातली मुस्लीम आणि दलित मतं महाविकास आघाडीकडे गेली. त्याचा थेट फायदा उद्धव ठाकरेंना झालेला दिसून येतो.
 
4. काँग्रेस आणि शरद पवार गटाची मिळालेली साथ
अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या मदतीशिवाय उद्धव ठाकरे यांना ही निवडणूक शक्य नव्हती.
त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या मतदारसंघांवर नजर टाकली तर लक्षात येईल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं थेट त्यांना ट्रान्सफर झाल्याचं दिसून आलं आहे.
 
शिवाय जागावाटपासारख्या कळीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांनी बऱ्याच अंशी सामजस्याची भूमिका घेतली. सांगलीच्या जागेवरून थोडी ताणाताण झाली, पण विशाल पाटील यांनी बंडखोरी करून काँग्रेसच्या बाजूने ती भरून काढली.
भाजपबरोबच्या युतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या जागा वाटपाची आणि फॉर्म्युलाच्या जेवढी चर्चा आतापर्यंत माध्यमांमध्ये झाली होती. तेवढी मात्र यावेळी झाली नाही.
 
5. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांनी केलेली कामगिरी
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळालेला कार्यकाळ अत्यंत नाजूक होता. त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातला साधारण दीड वर्षांचा कार्यकाळ कोव्हिड सारख्या महासाथीत गेला. त्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामांची अनेकांनी स्तुती केली.
 
कोव्हिडच्या काळात राबवलेला 'धारावी पॅटर्न' हा जगासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतो असं उद्धव ठाकरेंनी या मॉडेलबद्दल म्हटले होते.
 
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी थेट लोकांशी कौंटुंबिक पातळीवर जाऊन संवाद साधला. या मुळे त्यांना प्रतिमा निर्मितीत चांगली मदत झाली.
 
त्यांची हीच कोव्हिड काळात तयार झालेली प्रतिमा, त्यात त्यांना आलेलं आजारपण, ऐन आजारपणात पक्षात पडलेली फूट, आजारपणात भाजपानं दगाबाजी केल्याचा त्यांचा प्रचार आणि लोकांची त्यांना मिळेली साथ ही त्यांच्या या यशाची खरी क्रोनोलॉजी म्हणता येईल.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

बलात्कार प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अभिषेक पोरेलचे बंगाल संघात पुनरागमन

8th October Indian Air Force Day 2026: भारतीय वायुसेना दिन; इतिहास आणि महत्त्व

विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना पकडला गेला तर....आयआयटी मुंबईने कॉपी करण्याच्या नियमांचा एक नवीन मसुदा तयार केला

दुष्काळसंदर्भात महाराष्ट्र सरकारचे केंद्र सरकारकडे आवाहन; फडणवीस यांची शाह यांच्याशी भेट; केंद्रीय पथक दौरा करणार

महाराष्ट्रातील "शहरी माओवाद्यांचे" जाळे: सरकारने उच्च न्यायालयात स्पष्ट केले हा विशेष कायदा का लागू करण्यात आला

पुढील लेख
Show comments