गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (21:58 IST)

शिवसेनेचे ९० टक्के आमदार नाराज : बावनकुळे

विकास कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली असल्याने सत्ताधारी काँग्रेससह शिवसेनेचे ९० टक्के आमदार नाराज असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते भारतीय जनता पार्टीच्या मुंबई कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत होते.
 
महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेसाठी तीनही पक्ष एकत्र आले. परंतु त्यांच्यातील अंतर्गत वाद अजून कायम आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची कामे खोळंबली असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण असल्याचे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत १०० जागा निवडून येतील असा अंदाज याच नाराजीच्या भरवशावर जाहीर केला. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांची नाराजीच त्यांना फायद्याची ठरणार हे राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेतृत्वाला माहिती असल्याचा टोला देखील. चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.