1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (09:34 IST)

मुंबईत आमदारांसाठी कायमस्वरुपी 300 घरं बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM announces to build 300 permanent houses for MLAs in Mumbai मुंबईत आमदारांसाठी कायमस्वरुपी 300 घरं बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणाMaharashtra Mumbai News In Webdunia Marathi
मुंबईतील कष्टकऱ्यांना घरं बांधून देण्यासंबंधी राज्य सरकार गांभिर्याने विचार करत असल्याचं सांगत, आमदारांसाठीही मुंबईत हक्काच घर असणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केली आहे.
 
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर झोपडपट्टीयांना घरं मिळावीत, यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. मुंबईचा विचार हा अनेकदा सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून करण्यात आला. मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नाही. आता त्या कष्टकऱ्यांना घरं मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने गांभिर्याने विचार केला आहे."
 
"सर्वसामान्य लोकांचं झालं, आता लोकप्रतिनीधींचं काय? तर आपण जवळपास 300 आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना ही घरं देण्यात येतील. ही घरं आमदारांना कायमस्वरुपी देत आहोत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.