शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 मार्च 2023 (16:14 IST)

मुंबईत धावत्या लोकलमध्ये प्रवाशाला पेटवले

मुंबईच्या धावत्या आणि धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांची लाईफलाईन म्हणवली जाणाऱ्या लोकल मध्ये दररोज हजारो प्रवाशी  प्रवास करतात. लोकलचा प्रवास एका दिव्यांगांसाठी जीवघेणा ठरला आहे. धावत्या लोकलमध्ये एका दिव्यांगला पेटवण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याणला जाणाऱ्या लोकल रेल्वेत झाला आहे. दिव्यांगांवर नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या द्रव्याने दिव्यांग प्रवाशाला पेटवण्याचा प्रयत्न एका आरोपी गर्दुल्ल्य्याने केला.

प्रमोद वाडेकर असे या पीडित दिव्यांग प्रवाशाचे नाव असून सदर घटना शनिवारी रात्री 10 :45 ते 11 वाजेच्या सुमारास कळवा -मुंब्रा स्थानकादरम्यान घडली. आरोपी दिव्यांगसाठी राखीव असलेल्या डब्यात बसला होता. पीडित प्रमोद यांनी त्याला त्या  डब्यातून जाण्यास सांगितले या वरून दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने रागाच्या भरात येऊन नशेसाठी वापण्यात घेणाऱ्या सोल्युशनला वाडेकरांच्या हातावर टाकले नंतर काडेपेटीने पेटवले या घटने मध्ये त्यांच्या डावा हात होरपळला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.ठाणे लोहमार्ग पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.    
 
Edited By - Priya Dixit