1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (09:02 IST)

अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा उभा करणार- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

सातारा- महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज व अफजलखान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याप्रसंगाची इतिहासात महत्वाची नोंद आहे. जी आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित करीत असते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा (शिवप्रताप स्मारक) उभारण्यासाठी तसेच लाईट व साउंड शो सुरु करण्याबाबत “हिंदू एकता आंदोलन, सातारा” व इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप देखावा अशा प्रकारची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. उपरोक्त प्रकरणी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor