Daily Horoscope
✕

दुर्दैवी : शेतीची मशागत करताना अनर्थ घडला, रोटाव्हेरमध्ये अडकून टॅक्टर चालकाचा मृत्यू

Updated: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (20:49 IST)
 
वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्याच्या निरगुडी येथे ही घटना घडली आहे.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,   समुद्रपूर तालुक्याच्या निरगुडी येथे शेताची रोटाव्हेटरने मशागत सुरु होती. त्याचवेळी टॅक्टर चालकाचा अचानक तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचवेळी तो थेट रोटाव्हेटरमध्ये आल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये टॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. पुरषोत्तम देवराव धोटे असं मृत टॅक्टर चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे निरगुडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
निरगुडी येथील निलेश धोटे यांनी रब्बी हंगाम सुरू झाल्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी रोटाव्हेटर यंत्र असलेले टॅक्टर बोलावले होते. शेतीची मशागत सुरु असताना अचानक टॅक्टरचालक पुरषोत्तम धोटे याचा टॅक्टरवरून तोल गेला आणि ते खाली पडले. यात पुरषोत्तमच्या अंगावरून टॅक्टरचे मोठे चाक गेले आणि त्याचे पाय रोटाव्हेटरमध्ये अडकले.
 
या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या पुरषोत्तम यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती निरगुडी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर संपूर्ण गावाने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी पुरषोत्तम यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला. या घटनेमुळे गावात खळबळ माजली असून याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

भारत ग्लोबल केमिकल्स हब बनणार: केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'इंडिया केम २०२६'चे उद्घाटन

'शारीरिक संबंधासाठीपुरुष ४० दिवस संयम कसा पाळणार?' मुफ्तींच्या आक्षेपार्ह विधानामुळे पाकिस्तानी महिलांमध्ये संतापाची लाट

LIVE: मुंबईत वसतिगृहात सापडला १९ वर्षीय ICT अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृतदेह

Diwali Holidays in Maharashtra Schools महाराष्ट्रातील शाळांना २ ते १४ नोव्हेंबरपर्यंत सलग १३ दिवसांची दिवाळीची सुटी

संपूर्ण राज्यात उष्णतेचा प्रभाव कायम; मुंबई, पुण्यासकट तुमच्या शहरातील परिस्थिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments