राणेंनी फक्त मंत्रिपदाचा 'फुलफॉर्म' सांगून दाखवा, आदित्य ठाकरेंची टीका
नारायण राणे यांनी गेल्या 16 वर्षांत मंत्री म्हणून केलेलं एक चांगलं काम दाखवावं. किमान त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा फुलफॉर्म तरी सांगावा, अशा शब्दांत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेना 56 वरून 5-6 वर आली आहे. त्यातील काहीजण माझ्या संपर्कात आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला होता.
यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, राणे यांना मागील 16 वर्षांची सवयच आहे. त्यांनी मंत्री म्हणून केलेलं एक तरी चांगलं काम दाखवावं. चार पक्षात जाऊन त्यांनी एकही काम केलं नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. ही बातमी ई-सकाळने दिली.
Published By- Priya Dixit