Festival Posters

आदित्य ठाकरे गुरुवारी मोहोळच्या दौर्‍यावर

Updated: मंगळवार, 2 जुलै 2019 (14:53 IST)
 
ठाकरे यांच्या दौर्‍याच्या नियोजनासाठी येथील विश्रामगृहात सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी पीकविमा मदत केंद्राचा आढावा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र हे अभियान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. 
 
दरम्यान, बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांगावांमध्ये शिवसेनेच्या शाखा आणि गावातील प्रत्येक वॉर्डात शाखा प्रमुखांच्या निवडी करणे तसेच महिला आघाडीच्या महिला शाखा संघटक नियुक्त करण्याच्या सूचना प्रा. सावंत यांनी दिल. शिवसेनेचे हे अभियान 1 ते 26 जुलैपर्यंत सुरू आहे.
 
या बैठकीला ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल वाघमारे, सचिन बागल, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे, सुधीर अभंगराव, चरण चवरे, महावीर देशमुख, जयवंत माने, रवींद्र मुळे, संजय घोडके आदी उपस्थित होते.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments