रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2019 (08:08 IST)

आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढविणार नाही

आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करतांना माझ्या पोरांबरोबरच इतरांच्या पोरांचे लाड करतो, असा खोचक टोला त्यांनी मारला आहे.
 
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू पार्थ पवार, काँग्रेसचे दिवंगत नेते बाळासाहेब विखे-पाटील यांचा नातू डॉ. सुजय यांच्यापाठोपाठ आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हेदेखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला आहे