Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अद्वय हिरे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

Updated: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (08:36 IST)
 
हिरे यांच्यावर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रेणूका सुत गिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
 
त्यानंतर अद्वय हिरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत असताना ते भोपाळ येथे असल्याचे समजले. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
 
दरम्यान, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 31 कोटी 40 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसह 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंत्रमाग प्रकल्पासाठी बोगस दस्तऐवज दाखवून कर्ज उचलल्याचा आरोप आहे.










Edited by- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: 'अंमली पदार्थ विरोधी कृती दल' स्थापन होणार

मॉस्कोमधील रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट, स्फोटके बाळगणाऱ्या महिलेसह तिघांचा मृत्यू

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा संघटनात्मक फेरबदल

शक्तीपीठ महामार्गावरून ९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा

हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहोचले

पुढील लेख
Show comments