शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (15:51 IST)

खोके बंद झाल्यावर बाप लेक सैरभैर झालेत

Atul Bhatkhalkar
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “खोके बंद झाल्यावर बाप लेक सैरभैर झालेत. मातोश्री ३ च्या प्लॅनचे काय होणारं ही चिंता सतावते आहे” असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच “उठा उठा सकाळ झाली. बालिश आरोप करण्याची वेळ झाली...” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 
 
अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “वसूली आणि टक्केवारी, वाझेची तरफदारी करण्यात इतके बिझी होते की बाकी उद्योगाकडे पाहायला वेळ मिळाला नाही. खोके बंद झाल्यावर बाप लेक सैरभैर झालेत. मातोश्री ३ च्या प्लानचे काय होणारं ही चिंता सतावते आहे. राहुलजींशी चर्चा करून काही दिवस थायलँडमध्ये जाऊन या…” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. 
Edited by: Ratnadeep Ranshoor