गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (10:52 IST)

वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिरावरील विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या प्रस्तावित दौऱ्यावरदेखील अजित पवार यांनी तोंडसुख घेतलं. 
 
शिवसेनेचे नेते म्हणे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. ज्यांना वडिलांचं स्मारक अद्याप बांधता आलं नाही, ते अयोध्येत जाऊन काय दिवे लागणार?, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. औरंगाबाद महापालिकेच्या कारभारावरदेखील पवार यांनी सडकून टीका केली. गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ज्यांना कचरा साफ करता आला नाही, ते राज्य काय चालवणार?, असा खोचक सवाल ही पवार यांनी केला.