Daily Horoscope
✕

दोन वर्षांपासून बंद अंगणवाड्याही उघडणार

Updated: शनिवार, 12 मार्च 2022 (16:43 IST)
 
विधान परिषदेत आमदार रणजित पाटील यांनी अंगणवाडीतील बालकांना गरम ताजा आहार केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला असताना यशोमती ठाकूर यांनी सांगितले की कोविड काळात अंगणवाड्या सुरू ठेवणे आणि बालकांना आहार देणे शक्य नव्हते, त्यामुळे सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला होता. गरम ताज्या आहाराच्या ऐवजी बालकांना त्यांच्या घरापर्यंत पोषण आहार मिळेल याची तजवीज केली. यासाठी सरकारने टेक होम रेशन ही योजना सुरू केली होती आणि या योजनेद्वारे गेली दोन वर्षे नियमितपणे राज्यातील लाखो अंगणवाडी बालकांना पोषण आहार पोचवण्यात आला.
 
त्यांनी म्हटले की आता कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आली असून अंगणवाड्या येत्या दोन दिवसात सुरू करण्याचा निर्णय घेणार आहोत. अंगणवाड्या सुरू झाल्यानंतर बालकांना पुन्हा गरम ताजा आहार दिला जाईल. यासाठी 45 निविदा काढण्यात आल्या आहे आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून बालकांना पुन्हा एकदा सकस गरम ताजा आहार अंगणवाड्यांच्या माध्यमातून दिला जाईल, अशी ग्वाही ठाकूर यांनी सभागृहात दिली.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर की पेट्रोल स्कूटर कोणती स्कूटर सर्वाधिक बचत देते जाणून घ्या

मुंबई गुन्हे शाखा आणि बीएमसीची मोठी कारवाई अनेक क्लिनिकवर छापे १० बोगस डॉक्टरांना अटक

LIVE: महाराष्ट्र एफडीएची कारवाई कॅन्डेला फार्माची ३ गोदामे सील

नाशिकमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजी आमदार आसिफ शेख यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीसांना दिला

नाशिकमध्ये धार्मिक उपासनेच्या नावाखाली ब्लॅकमेल करून बलात्कार, गुन्हे दाखल

पुढील लेख