रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:23 IST)

Weather News: अनेक भागांना अवकाळीचा धोका

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, होळीची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसी उष्णता वाढत आहे. त्यामुळं अजूनही काही राज्यांमध्ये थोडीशी थंडी जाणवत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कांदा, हरभरा, द्राक्ष, केळी या पिकांसह आंबा, काजू, जांबू या पिकांनाही फटका बसला आहे. 
 
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात बरसणार पावसाच्या सरी
गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाच्या सरी ह्या बरसत आहेत. त्यामुळे फळबागांचे तर नुकसान झालेलेच आहे पण द्राक्ष तोडणी सुरु असतानाच होत असलेल्या पावसामुळे थेट घडावर परिणाम होत आहे. हंगामाच्या सुरवातीपासून अवकाळीची सुरु झालेली अवकृपी अंतिम टप्प्यातही कायम आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आतापर्यंत ढगाळ वातावरणच होते. पण शुक्रवारी मध्यरात्री सोलापूरसह पुणे, चाकण परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे. शिवाय आता मराठवाड्यातही शनिवारी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.