Daily Horoscope
✕

नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर तलवारीने हल्ला, रुग्णालयात दाखल

Updated: गुरूवार, 13 ऑगस्ट 2026 (17:31 IST)
ALSO READ: पुरंदरमध्ये १० वर्षीय मुलीवर बलात्कार; ६० वर्षीय आरोपीला अटक; कोलविहिरे परिसरात संतापाची लाट
घटनेच्या वेळी बादल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यादेखील उपस्थित होत्या. हल्ल्यानंतर बादल यांना यशोसाई रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले. बादल गुरुद्वाराकडे जात असताना, एक व्यक्ती अचानक त्यांच्याजवळ आला आणि त्याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला.
 
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री बादल यांच्या विशेष सुरक्षेत तैनात असलेले निरीक्षक संतोष केंद्रे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेत केंद्रे हेदेखील जखमी झाले. 
 
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहे. या हल्ल्यामुळे शिरोमणी अकाली दल (एसएडी) तीव्र संतप्त झाले आहे. 
 
मिळालेल्या वृत्तानुसार, बादल यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे नांदेड आणि पंजाबमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि तपास सुरू केला. रुग्णालयाच्या सूत्रांनुसार, सुखबीर बादल यांना प्रथमोपचार देण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच, त्यांचे मोठ्या संख्येने समर्थक आणि पक्षाचे कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवाराबाहेर जमा होऊ लागले.
 
सुखबीर सिंग बादल कोण आहेत?
शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) ज्येष्ठ नेते सुखबीर सिंग बादल यांनी २००९ ते २०१७ या काळात पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. ते पंजाबमधील सर्वात जुन्या प्रादेशिक पक्षांपैकी एक असलेल्या शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष असून, शीख राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व मानले जातात. सुखबीर सिंग बादल हे पंजाबचे दिवंगत माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे सुपुत्र आहे. त्यांनी लोकसभेत खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. गेल्या दोन दशकांपासून पंजाबच्या राजकारणावर त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा थेट प्रभाव राहिला आहे.
ALSO READ: ऑनलाइन राइड बुकिंगचे नियम बदलले, हे वैशिष्ट्य आता ॲपमध्ये उपलब्ध राहणार नाही
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: हिंगोली रेल्वे स्थानकावर गोंधळ; जोधपूर-हैदराबाद ट्रेन दोन तास थांबवली! आरपीएफ जवानांवर मारहाणीचा आरोप

भारत ग्लोबल केमिकल्स हब बनणार: केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'इंडिया केम २०२६'चे उद्घाटन

'शारीरिक संबंधासाठीपुरुष ४० दिवस संयम कसा पाळणार?' मुफ्तींच्या आक्षेपार्ह विधानामुळे पाकिस्तानी महिलांमध्ये संतापाची लाट

Diwali Holidays in Maharashtra Schools महाराष्ट्रातील शाळांना २ ते १४ नोव्हेंबरपर्यंत सलग १३ दिवसांची दिवाळीची सुटी

संपूर्ण राज्यात उष्णतेचा प्रभाव कायम; मुंबई, पुण्यासकट तुमच्या शहरातील परिस्थिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments