Daily Horoscope
✕

काकुने यकृत दान करत पुतण्याचा वाचवला जीव

Updated: शनिवार, 24 जून 2023 (21:23 IST)
 
अधिक माहिती अशी की, बागलाण तालुक्यातील आनंदपूर येथील डॉ अरुण आत्माराम अहिरे यांची नामपूर येथे पथोलॉजी लॅब आहे. तर डॉ अरुण यांचे कुटुंब तालुक्यातील आनंदपूर याठिकाणी वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांना कावीळ सदृश्य लक्षणं जाणवू लागली. अनेक ठिकाणी उपचार केले परंतु यश आले नाही. यानंतर काही दिवसांनी हा त्रास वाढत गेला. यानंतर यकृत निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 
दिवसागणिक हा त्रास वाढत गेला. यानंतर यकृत दान करून ते प्रत्यारोपण करावे लागेल असेही डॉक्टरांनी सांगितले. यकृत दान करणारी व्यक्ती कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील असावी असेही डॉक्टरांनी सांगितल्यानंतर प्रथमत: आईने यकृत देण्यासाठी तयारी दर्शिवली. यकृत दान करण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया सुरु झाल्या.
 
मात्र, यकृतात अधिक चरबी असल्यामुळे हे यकृत प्रत्यारोपण करता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, आता काय करावे असा मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा होता. यानंतर डॉ अरुण यांची काकू वंदना अर्जुन अहिरे या यकृत दान करण्यासाठी तयार झाल्या. त्यांनी सांगितले की, तुमचा मुलगा आणि माझा मुलगा एकच. माझ्या यकृताची तपासणी करावी मी हे यकृत दान करण्यासाठी तयार असून माझा मुलगा वाचला पाहिजे एव्हढंच. यानंतर मावशीच्या यकृताची तपासणी केली. हे यकृत दान करता येईल असे डॉक्टरांनी जेव्हा सांगितले तेव्हा कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला.
 
मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल या एकाच दवाखान्यात काकू आणि पुतण्याला दाखल करण्यात आले. काही दिवस ऍडमिट ठेवल्यानंतर काकूचे यकृत काढण्यात आले. यानंतर काही वेळेतच पुतण्यावर यकृत प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरु झाली. यानंतर दोघांवर यशस्वी उपचार करण्यात आले. नुकतेच मावशीला या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती चांगली आहे. लवकरच डॉ अरुण यांनादेखील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून त्यांना योग्य ती काळजी पुढील काही दिवस घ्यावी लागणार असून नंतर ते सर्वसामान्य जीवन जगू शकतील असा विश्वास ग्लोबल हॉस्पिटलचे डॉक्टर अमीत मंडोत यांनी व्यक्त केला.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments